पाम तेलाच्या दरवाढीमुळे सोयाबीनला फायदा

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I मलेशियन पाम तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. मागील आठवड्यातील निचांकी ३ हजार १७८ रिंगीट प्रतिटनावरून पामतेल सुधारले आहे. पाम तेलाच्या फ्युचर्स किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

 

पाच महिन्यांतील उच्चांकी दराकडे वाटचाल सुरू आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे तिथे झिरो कोरोना पॉलिसीची कडक अंमलबजावणी करण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. त्यामुळे अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता होती. पाम तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली असती. परंतु चीनमधील जनता सरकारच्या कडक निर्बंधांच्या विरोधात रस्त्यावर उतरली. लोकांच्या निदर्शनांमुळे सरकारने झिरो कोरोना पॉलिसीबद्दल एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे पाम तेलाच्या मागणीवर परिणाम होण्याची भीती निकालात निघाली आहे. आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment