तुरीची आवक झाली कमी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | सध्या बाजारात तुरीची आवक नगण्य आहे. स्टॉकिस्ट, मिलर्स आणि व्यापारी नवीन हंगामातील आवक कधी सुरू होईल, याची वाट बघत आहेत. कर्नाटकात डिसेंबरच्या मध्यावर नवीन आवक सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा देशातील तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत घटण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने तूर उत्पादनाच्या अंदाजात कपात केली आहे. आधीच्या अंदाजानुसार यंदा ४३.४ लाख टन तूर उत्पादन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता सुधारित अंदाजानुसार उत्पादन ३८.९ लाख टनावर आणले आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment