तुरीला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपयांचा भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I सरकारने यंदा ३९ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला. तर उद्योगाचा अंदाज ३२ ते ३५ लाख टनांच्या दरम्यान आहे. मात्र तूर बाजारातील जाणकार यंदा २७ ते ३० लाख टनांवर उत्पादन स्थिरावेल असं सागंत आहेत. तर देशात वर्षाला ४४ लाख टन तुरीचा वापर होतो.

म्हणजेच कोणाचाच अंदाज वापराऐवढा नाही. सरकारनेही उत्पादन कमी होणार हे गृहीत धरून आयात वाढवली. मात्र जागतिक बाजारात १० लाख टनांपेक्षा अधिक तूर नसते. त्यामुळं यंदा विक्रमी आयात झाली तरी तूर दर पडणार नाहीत. पण हाती तूर आल्यानंतर शेतकरी विक्री कशी करतात? यावर बाजार बराच अवलंबून राहील असा अंदाज सुरुवातीपासून अभ्यासक व्यक्त करत आहेत.

देशात सध्या तुरीला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतात, असंही जाणकारांनी सांगितलं.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment