मोझांबिक देशातून तूर आयातीचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ | मोझांबिक देशातून जास्तीत जास्त तूर आयातीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मोझांबिकमधून तूर निर्यात काही कारणास्तव ठप्प झाली होती. मात्र भारत सरकारने मध्यस्थी करून मार्ग काढल्यामुळे तूर आयातीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकार यंदा आफ्रिकी देशांमधून विक्रमी तूर आयात करणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र देशातील उत्पादन कमी असल्यानं त्याचा बाजारावर फारसा परिणाम होणार नाही, असंही जाणकार सांगत आहेत. तुरीचा बाजार ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment