कृषीसेवक | १२ ऑगस्ट २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी नेहमीच मोठ्या संकटात सापडलेले असतात यामध्ये दुष्काळ असेल पूरस्थिती असेल अतिवृष्टी असेल अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. पण या सर्व संकटावर नेहमीच शेतकरी मात देत शेतात पिक फुलवत असतो. तरी सुद्धा फुलविलेले पीक नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर नेहमीच येत असते. अशीच वेळ नशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात खूप कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ झाली नसल्याचे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेत पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अनेक टोकाचे निर्णय घेत आहेत. उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र सध्या पाण्याअभावी एका शेतकऱ्याने दीड एकरावरील मूफ पिकावर ट्रॅक्टर फिरवल्याची माहिती समोर आली आहे. हातातून पीक गेल्याचे पाहून एवढा टोकाचा निर्णय या शेतकऱ्याने घेतला आहे. येवला तालुक्यातील अंकाई येथील हवालदील झालेल्या शेतकऱ्याने जवळपास दीड एकरावरील मूग पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. बाळासाहेब गोराणे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये कडक ऊन पडत आहे. त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर चांगलाच पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी देखील संकटात सापडले आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी थोडाफार रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला होता यावर शेतकऱ्यांनी पेरणी देखील केली होती. सध्या मुसळधार पावसाची वाट शेतकरी पाहत आहेत. मात्र अजूनही मुसळधार पाऊस झाला नाही परिणामी शेतकऱ्यांची उगवून आलेली शेती पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण होऊन शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. फक्त नाशिक जिल्हा नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणावा असा पाऊस पडला नाही यामुळे येथील शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. अहमदनगर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये अद्यापही पावसाने चांगली हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. पुढील आठवड्यापर्यंत जर या ठिकाणी पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके नष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.