कृषी सेवक । १५ जानेवारी २०२३ । पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातही काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. परंतु मागील काही वर्षांपासून ऊस तोडणीला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आता सरकारकडून पैसे मिळणार आहेत
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीच्या प्रश्न काही प्रमाणात का असेना सुटण्याची शक्यता आहे.
या निर्णयासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडकरी यांनी विशेष आभार मानले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तोडणीसाठी यांत्रिकीकरणाच्या मदतीने आता शेतकरी आपला ऊस वेळेत साखर कारखान्यांकडे पाठवू शकतील आणि ऊसाचे वजन कमी होण्याच्या शक्यता टाळू शकतील तसेच वेळेवर मोबदला मिळवू शकतील. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी! ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल.