तेलबिया पिकांच्या दरात क्विंटल मागे २०० रुपये वाढीची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३ जानेवारी २०२३ । यंदा जगात सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात ३ हजार ९११ लाख टनांवर असलेलं सोयाबीन उत्पादन यंदा ३ हजार ५५६ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज आहे.

 

पण जागतिक सोयाबीन उत्पादनातील ही वाढ अर्जेंटीना आणि ब्राझील या दोन देशांमध्ये उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने होणार, असं युएसडीएनं स्पष्ट केलं. देशातील खाद्यतेलाचे दर कमी होत नाही म्हणून आयातशुल्क कमी ठेवले आहे.

 

याचा थेट फटका मात्र शेतकऱ्यांना बसतोय. सरकारने खाद्यतेलावरील आातशुल्क वाढवल्यास सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment