कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | गव्हाच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी सरकार सध्या हस्तक्षेप करणार नाही, असं केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले . गव्हाच्या हमीभावातील वाढ आणि महागाईचा दर लक्षात घेतला तर गव्हाच्या किंमती जास्त वाढलेल्या नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.
देशात सध्या गहू आणि तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे सरकार सध्या आपल्याकडील साठा विक्रीसाठी बाहेर काढणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. १ एप्रिल २०२३ पर्यंत सरकारकडे ११३ लाख टन गव्हाचा साठा असेल. बफर स्टॉकच्या निकषानुसार हा साठा ७५ लाख टन असणं अपेक्षित आहे. दरम्यान, देशात गव्हाच्या किंमतींतील तेजी कायम आहे. या आठवड्यात देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गव्हाच्या किंमती चढ्या राहिल्या.