राज्यातील ‘या’ भागात होणार मुसळधार पाऊस !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १८ ऑगस्ट २०२३ | ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र मागच्या एक-दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मागच्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी निराश होते. पेरणी केलेली पीक उगवून आले असून ते सुकू लागली होते मात्र पावसाअभावी पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते मात्र आता पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठवाडा तसेच अहमदनगर सोलापूर पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडला नव्हता. त्यामुळे येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते आता. लवकरात लवकर मुसळधार पाऊस पडावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे कारण अजूनही ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणचे नदी नाले कोरडे आहेत. कारण आगामी काळामध्ये मुसळधार पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. सध्या देखील राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून पावसाला सुरुवात झाली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दरम्यान आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसापासून मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे आता मराठवाड्यात पुढील एक ते दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातच लवकर पावसाचा कमबॅक होईल असा अंदाज हवामाना विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मागच्या दोन-तीन दिवसापासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली आहे. पुणे मुंबई मध्ये देखील पावसाला सुरुवात झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस जोर धरेल. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये देखील पाऊस चांगला पाऊस होईल.

बातमी शेअर करा
#rain#Weather
Comments (0)
Add Comment