सर्वच शेतकऱ्यांना नुकसानदायी ठरणारा “हा” रोग, पुढील ६ वर्षांत नष्ट करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ एप्रिल २०२४ | लाळ्या खुरकूत रोग हा जनावरांना होणारा जीवघेणा रोग आहे. या रोगामुळे जनावरांच्या तोंडाची कातडी निघते. ज्यामुळे जनावर चारा खाणे कमी करते. शिवाय पाणी देखील कमी पिते. तसेच पायांच्या खुरांना देखील या रोगामुळे संक्रमण झालेले असते. परिणामी, अशा जनावराची दूध देण्याची क्षमता खूपच कमी होते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.

जनावरांच्या लाळ्या खुरकूत रोगाबद्दल डेअरी उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकरी चांगलेच परिचित आहे. या जीवघेण्या रोगाबाबत आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वच शेतकऱ्यांना नुकसानदायी ठरणार हा रोग, पुढील ६ वर्षांत अर्थात २०३० पर्यंत समूळ नष्ट केला जाणार आहे. या रोगावरील लसीकरण प्रक्रिया देशभरात वेगाने राबवली जात आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात लवकरच यश मिळेल. असे म्हटले आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यात गुरुवारी (दि.५) आयोजित जाहीर सभेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सरकारने जनावरांचे आजार समूळ नष्ट करण्याचा संकल्प केला असून, देशभरात मोफत लसीकरण राबवले जात आहे. देशभरात जवळपास १५,००० हजार कोटी रुपये खर्चून लाळ्या खुरकूत रोगाचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत. त्यात पुढील सहा वर्षांमध्ये अर्थात २०३० पर्यंत पूर्णपणे यश मिळण्याची शक्यता आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धविकास विभागाच्या आकडेवारीनुसार, देशभरात लाळ्या खुरकूत रोगावरील लसीकरण अभियान वेगाने सुरु आहे. सदर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मार्च २०२४ पर्यंत आतापर्यंत देशभरातील २४ कोटी गाय, म्हैस अशा जनावरांना या रोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. अर्थात दुसऱ्या टप्प्यातील आतापर्यंत ९५ टक्के लक्ष्य पूर्ण करण्यात केंद्राला यश मिळाले आहे. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमुई जिल्ह्यात सभेला संबोधित करताना पशुधनाची रक्षा करण्याचा संकल्प केला आहे.

बातमी शेअर करा
#CowDisease#CowDiseaseFootMouthDisease
Comments (0)
Add Comment