‘या’ राज्यात यंदा विक्रमी उत्पादन होणार; बाजारात गव्हाची आवक वाढली!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ एप्रिल २०२४ | देशातील गहू काढणी हंगाम सध्या जोरात सुरु आहे. प्रामुख्याने सुरुवातीपासून यावर्षी टप्प्याटप्प्याने पाऊस होत राहिला. ज्यामुळे त्याचा गहू पिकाला फायदा झाला. शिवाय यंदा गहू पिकाला आवश्यक असणारी कडाक्याची थंडी देखील संपूर्ण हंगामात कायम होती. ज्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील वातावरण गहू पिकाच्या पथ्यावर पडले आहे. अशातच आता देशातील आघाडीचे गहू उत्पादक राज्य असलेल्या पंजाबमध्ये यंदा विक्रमी गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे.

पंजाब या राज्यामध्ये सरकारी गहू खरेदी १ एप्रिल पासून सुरु झाली आहे. राज्यातील जवळपास १,३०७ बाजार समित्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक सुरु झाली आहे. साधारणपणे पंजाबमध्ये मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक होण्यास सुरुवात होते. परंतु, यंदा गहू आवक काहीशी उशिराने सुरु झाली आहे. अर्थात गहू पिकाने परिपक्वतेसाठी वेळ घेतल्याचे पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू एस. एस. गोसल यांनी म्हटले आहे. यंदाचे थंड हवामान आणि उशिराने होणारी काढणी हे गहू उत्पादन नेहमीपेक्षा अधिक होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंतचा राज्याचा १८२.५७ लाख टन उत्पादनाचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. असे देखील त्यांनी म्हटले.

बातमी शेअर करा
#WheatProduction
Comments (0)
Add Comment