देशभरात हळदीचे भाव तेजीत

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २० ऑक्टोबर २०२३

देशभरात गेल्या काही वर्षापासून मोठी महागाई सुरु असतांना शेतकऱ्यांवर देखील याचा फटका बसू लागला आहे. त्यातच सातत्याने शेतकऱ्यांच्या बियाणेचे देखील दर वाढू लागले आहे. यात आता देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून हळदीचे भाव तेजीत आहेत.

बाजारातील कमी झालेला पुरवठा आणि वाढलेली मागणी यामुळे भावात तेजी होती. पण पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झाला होता. तर नफावसुलीसाठी विक्रीही वाढली होती. आता सणांचा काळा तोंडावर आहे. त्यातच वाढलेल्या भावात खरेदी केलेल्या हळदीचा स्टाॅक देशात आहे. भाव वाढल्याने गरजेप्रमाणे हळदीची खरेदी विक्री सुरु आहे. याचा दबाव हळदीच्या भावावर कायम आहे. वाढलेल्या भावात हळदीची निर्यातही कमीच आहे. विदेशातून वाढलेल्या भावात मागणी येत नसल्याचे निर्यातदारांनी सांगितले. या सर्व कारणांनी हळदीच्या दरात काहिशी नरमाई आली. सध्या बाजारात हळदीला प्रतिक्विंटल ९ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे.

बातमी शेअर करा
#turmeric
Comments (0)
Add Comment