कृषी सेवक | ३ एप्रिल २०२४ । या उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना राज्यात अवकाळी पावसाने चांगलीच झडप घातलेली आपल्याला दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आलेला आहे. पंढरपूर, वाशीम, अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तसेच नाशिक या ठिकाणी अवकाळी पाऊसाने हझेरी लावलेली आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा बागांसह उन्हाळी अनेक पिकाचे नुकसान झालेले आपल्याला दिसत आहे.
सध्या वातावरणात उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या पावसाने उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा दिला आहे. मात्र अचानक अवकाळी आलेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. वाशिम जिल्ह्याचे तापमान मागील आठवड्यापासून 40°c पर्यंत पोहोचलेले होते. मात्र अचानक काल तिथे पाऊस पडला. यामुळे आंबा पिकांचे त्याचप्रमाणे उन्हाळी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
शेतकरीराजाला हवामान खात्याने पावसाबाबत शक्यता वर्तवली आहे. अकोला जिल्ह्याचे तापमान मागील २ दिवसांपासून ४२ अंश एवढे आहे. त्यामुळे आता हवामान विभागाने पावसाचा इशारा देऊन सतर्क राहण्याचा सल्ला दिलेला आहे.