व्हर्टीकल फार्मिंग बदल्यात काळाजी गरज

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ |हर्टीकल फार्मिंग म्हणजेच उभ्या मांडण्यांमध्ये किंवा शेल्फमध्ये विविधप्रकारचे ट्रे व कुंड्या वापरुन त्यात सुपिक माती अथवा इतर माध्यमे वापरुन(कोकोपिट, व्हर्मीक्लाइत, राईसब्रान, हायड्रोप्रनिक्स वगैरे) वापरुन त्यात सुर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश, वायु, पाणी, तापमान, आर्द्रता आणि विद्रव्य खते (आवश्यक अन्नद्रव्ये) यांचा नियंत्रित वापर करुन शेती केली जाते .

व्हर्टिकल फार्मिंगचे फायदे –
बदलणारे तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, गंभीर दुष्काळ ह्यासर्व समस्यांमध्ये हवामान नियंत्रित व्हर्टिकल फार्मिंग केल्यास लोकसंख्येच्या मागणी इतका पुरवठा आपण नक्कीच करु शकतो.
व्हर्टीकल फार्मिंगचा अजुन एक फायदा म्हणजे हे तंत्र अवलंबल्यास यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होईल.

हरितगृहाचा वापर
व्हर्टिकल फार्मिंग करताना हरितग्रहाचा वापर करणे शक्य आहे. कारण हरितगृहामध्ये एकदा कोणते पीक घ्यायचे आहे याची निश्चिती झाल्यावर स्टॅन्ड चा चपखल वापर करून उत्पादन घेणे शक्य आहे. हरितगृहाच्या वापरामुळे पिकानुसार सूर्यकिरणांची तीव्रता कमी करणे शक्य होते. त्याचप्रमाणे पिकासाठी आवश्यक तापमान आणि वायू निर्मिती यांच्या मदतीने कमी जागेत दर्जेदार पीक घेता येते.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment