राज्यात पाण्याचे संकट : धरणामध्ये केवळ इतके पाणी शिल्लक !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १८ ऑक्टोबर २०२३

देशासह राज्यात ऑक्टोबर हिटचा फटका आता बसू लागला आहे तर मॉन्सून गायब झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ४० टक्क्यांहून पाऊस कमी झाला आहे. यामुळे अनेक तालुक्यांमध्ये खरिपाची पेरणीच झाली नाही. तर ज्या ठिकाणी खरिपाची पेरणी झाली त्या पिकांना पावसाअभावी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे राज्यातील ४३ तालुक्यात भयावह परिस्थिती असल्याने ट्रीगर टू लागू करण्यात आला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्वच धरणांमध्ये जेमतेत ७५ टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यात जवळपास २ हजार ९९४ लहान मोठी धरणे आहेत. यामध्ये फक्त ७५.६० टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे. मागच्या काही वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात साधारण सरासरी ९० ते ९५ टक्के पाणी शिल्लक असायचे. मागच्या वर्षी १५ ऑक्टोबच्या दरम्यान ९०.७५ टक्के पाणी साठा धरणांमध्ये शिल्लक होता. यंदा मात्र ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पाण्याचा साठा इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने राज्यावर पाणी टंचाईचे सावट पसरले आहे.

कोकण वगळता इतर कोणत्याही विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्ल्क नाही. कोकणाला पाणीपुरवठा करणाऱ्या १७३ धरणांमध्ये ९३.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ९२० धरणांमध्ये ४०.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणे ९० टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहेत तर सातारा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे परंतु सांगली जिल्ह्यातील मात्र परिस्थिती चिंताजनक आहे. राज्याच्या सर्व दोन हजार ९९४ लहान मोठ्या धरणांमध्ये मिळून केवळ ७५.६० टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत साधारण सरासरी ९० ते ९३ टक्क्यांच्या आसपास पाण्याचा साठा धरणांमध्ये शिल्ल्क असतो. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी ९०.७५ टक्के पाणी साठा धरणांमध्ये शिल्लक होता. यंदा मात्र ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पाण्याचा साठा ७५ टक्क्यांवर असल्याने कोरड्या दुष्काळाची भिती व्यक्त केली जात आहे. नागपूर विभागात ३८३ धरणे आहेत यामध्ये ८७.६६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर अमरावती विभागात २६१ धरणांत ८४.४९ टक्के पाणी शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ९२० धरणे आहेत यामध्ये ४०.५३ टक्केच पाणीसाठी आहे. नाशिकमध्ये ७८.२१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. पुणे विभागात ८१.०५ टक्के तर कोकणात ९३.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

बातमी शेअर करा
#water
Comments (0)
Add Comment