कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र राज्यात उन्हाळी हंगामात बहुतेक ठिकाणी टरबूज लागवड केली जाते. पूर्वी टरबूज लागवड म्हटले की ती फक्त नदी किनारी होत होती. मात्र आता शेतकरी बांधव योग्य नियोजन करून शेतात टरबूज पिकाची यशस्वी लागवड करताना दिसत आहे. चला तर आज जाणून घेवू, टरबूज लागवड नियोजन …
टरबूज लागवड प्राथमिक माहिती :-
टरबूज हे फळ उन्हाळी हंगामात सर्वाधिक मागणी असणारे फळ आहे.
कडक उन्हाळ्यात याला भरपूर मागणी असते.
योग्य नियोजन करून योग्य वेळी टरबूज बाजारात विक्री साठी आल्यास शेतकरी बांधवांना याचा उत्तम मोबदला मिळतो.
जमिनीची पूर्व तयारी :-
लागवडी करिता रान तयार करताना आडवी उभी नांगरणी करून काडी कचरा गोळा करून घ्यावा.
चांगले कुजलेले शेणखत एकरी १० ते १२ बैल गाडी जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.
रोटावेटर मारुन सरी तयार करून घ्यावी.
यंत्राच्या साहाय्याने मलचींग पेपर व्यवस्थित अंथरूण घ्यावा.
टरबूज लागवड खताचा बेसल डोस( प्रती एकर) :-
युरिया अर्धी बॅग
सिंगल सुपर फॉस्फेट १ बॅग
पोटॅश १ बॅग
निंबोळी पेंड १ बॅग
मॅग्नेशियम सल्फेट २५ किलो
क्लोरो १०% दाणेदार ३ किलो
सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो
जमीन व हवामान :-पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी दर्जाची जमीन निवडावी.
डिसेंबर अखेर, जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात लागवडीचे नियोजन करावे.
लागवड :-नेहमी रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी.ठिबक आणि मलचिंग पेपर असल्यास उत्पादनात वाढ होते.बी टोकण पद्धतीने लावावे.दोन रोपांतील अंतर 1.5 ते 2 फूट ठेवावे.
बियाने प्रमाण :-एकरी सहा ते सात पाकिटे लागतात.
रोप असल्यास :-
काही शेतकरी बांधव नर्सरी मधून रोपे खरेदी करून लावतात.रोप खरेदी करताना ते निरोगी, योग्य वयाचे आणि हिरवेगार असणे आवश्यक आहे.
जाती :-
लागवडी साठी टरबूज जाती योग्य निवडणे गरजेचे आहे.बाजारात मागणी असलेले, आपल्या भागात उत्तम येणारे सुधारित जाती निवडावी.
काही खासगी कंपनीचे वाणाना बाजारात अधिक मागणी असते.मॅक्स, नामधारी NS 295, बाहुबली, शुगर किंग, ब्लॅक डायमंड इत्यादी.
पाणी व्यवस्थापन:-
जमिनीच्या प्रकारानुसार, हवामानानुसार पाण्याचे नियोजन करावे.
सर्वसाधारण आठवड्यात एकदा पाणी द्यावे.
ठिबक सिंचन असल्यास पाणी बचत होते. तसेच विद्राव्य खतांचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो.
आंतर मशागत :-
रोपाची चांगली वाढ होण्यासाठी प्लॉट नेहमी तण विरहित ठेवावा.
मलचींग पेपर वापरल्यास तण व्यवस्थापन करणे खूप सोपे जाते.
कीड व रोग नियंत्रण :-
प्रमुख किडी खालीलप्रमाणे, फळमाशी, फुलकिडे, नाग अळी, मावा, तुडतुडे,प्रमुख रोग खालीलप्रमाणे, मर रोग, फळकुज, करपा, भुरी
योग्य नियोजन अभावी फळामध्ये काही विकृती दिसतात.कीड व रोग नियंत्रण करताना नेहमी दर्जेदार उत्पादने वापरावीत. रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जाणवत असल्यास नीम ऑईल फवारणी करावी.फळ माशी प्रादुर्भाव कमी होण्यासाठी कामगंध सापळे लावावेत.वेलवर्गीय पीक असल्याने पानांवर लव जास्त असते. दमट हवामान, जास्त थंडी इत्यादी बाबींमुळे रोग येण्याची शक्यता जास्त असते.विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून रसशोषक किडीचा बंदोबस्त करावा. याकरिता चिकट सापळे, जैविक तसेच रासायनिक फवारणी करावी.अन्नद्रव्ये पुरेश्या प्रमाणात दिली गेली नाही तर झाड आजाराला लवकर बळी पडते.
विद्राव्य खतांचा वापर :-
१९.१९.१९ हे खत लागवड केल्यापासून २५ ते २८ दिवसाच्या आत रोपांच्या वाढीसाठी ठिबक किंवा फवारणी द्वारे वापरावे.१२.६१.०० हे खत ३५ ते ४० दिवसाच्या आत अधिक फुटवा होण्यासाठी वापरावे. फळ वाढीच्या अवस्थेत कॅल्शियम नायत्रेट आणि बोरॉन वापरावे.
काढणी व उत्पादन :-
टरबूज पीक १०० ते १२० दिवसात तयार होते.
पूर्ण वाढ झालेले फळ तोडून मार्केट मध्ये विक्रीसाठी न्यावे.
सरासरी १०० ते १५० क्विंटल माल निघतो.
प्रत्येक फळ सरासरी २ ते ४ किलोच्या आसपास आवश्यक आहे.