गव्हाची पेरणी यंदा २५.४३ टक्क्यांनी आघाडीवर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ११ डिसेंबर २०२२ I देशात यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. परिणामी यंदा रब्बीच्या पेरणीने वेग घेतला. देशातील रब्बी लागवडीचे क्षेत्र ९ डिसेंबरपर्यंत १२.२५ टक्यांनी वाढले आहे. गव्हाची पेरणी यंदा २५.४३ टक्क्यांनी आघाडीवर असून ज्वारीच्या लागवडीचा वेग गेल्यावर्षीप्रमाणेच आहे.

 

देशातील रब्बी पेरणी वेगाने सुरु आहे. रब्बी लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने पेरणी क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा वाढले आहे. रब्बीचा पेरा यंदा गेल्यावर्षीपेक्षा १२.२५ टक्क्यांनी अधिक आहे. आजपर्यंत म्हणजेच, ९ डिसेंबरपर्यंत देशात ५१४ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली. तर मागील हंगामात याच काळतील लागवड क्षेत्र ४५८ लाख हेक्टरवर होते.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment