जळगावच्या एका शेतकऱ्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेवर टिप्पणी करताना, मेव्हण्यांसाठीही अशीच योजना सुरु करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संबोधित करताना त्याने एका व्हिडीओमध्ये ही मागणी मांडली आहे. ‘मेव्हण्यांनाही हजार पाचशे रुपये द्या’ अशी त्याची विनंती आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, खानदेशी बोली भाषेत शेतकऱ्याने त्याची मागणी स्पष्टपणे मांडली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: महत्वाची माहिती
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेची सुरुवात १ जुलै २०२४ रोजी करण्यात आली आहे, आणि कमीतकमी ३.५० कोटी महिलांना या योजनेचा फायदा होण्याची आशा आहे.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठीच्या अटी:
1. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी.
2. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो.
3. वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
4. लाभार्थ्यांचे बँक खाते असावे.
5. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम