फेब्रुवारीच्या सुरुवातीला लिंबूने खाल्ला भाव !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १५ फेब्रुवारी २०२३।  प्रत्येक हिवाळ्यात २० ते ३० रुपये किलोने विकले जाणारे आता सध्या लिंबू महागले. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच लिंबूचा दर 120 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. उन्हाळा सुरू होताच लिंबूच्या दारात वाढ झाली आहे. यामुळे लिंबू सरबत पिणाऱ्यांना आपला खिसा उन्हाळाभर ‘गरम’च ठेवावा लागणार आहे. उन्हाचा कडाका जाणवू लागताच लिंबाच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे अवघ्या आठवडाभरात 100 रुपये किलोचा भाव गाठला. तर भाजी मंडईत तर 120 रुपये किलोपर्यंत लिंबू विकले जात आहे.

paid add

विशेष म्हणजे हिवाळ्यात वीस-तीस रुपये किलोने विकले जाणारे लिंबू जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात 50 ते 60 रुपयांपर्यंत विकले जात होते. तोच आता दर फेब्रुवारी महिन्यात शंभरीपार गेला आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात लिंबाचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढले असल्याचे बोलले जात आहे. तसेच सरबतवाले, रसवंती चालकांकडून लिंबाला जास्त मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. तर वेगवेगळ्या जिल्ह्यात लिंबाचे वेगवेगळे दर पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम