शेतकऱ्यांसाठी अटल बांबू योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ | शेतीतच नवनवीन प्रयोग करू पाहू असणाऱ्या आधुनिक शेतकऱ्यांसाठी नवीन वाटचाल करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बांबू शेती हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो .बांबूला हिरवं सोनं असंही म्हटले जाते. बांबू हि दीर्घायु आणि लवकर वाढणारी प्रजाती आहे .

 

बांबू लागवड केल्यापासून ४ ते ५ वर्षानंतर त्याचे उत्पादन मिळायला सुरुवात होते . भारतात दरवर्षी ६० दशलक्ष कोटी रुपये बांबूची आयात केली जातीय .गेल्या २० वर्षांपासून बांबूचे उत्पादन आशियामध्ये झपाट्याने वाढले आहे . बांबूचा वापर फ्लोअरिंगसाठी, बांबू पल्प ,बांबूची मॅट बोर्ड,फर्निचर,हँडीक्राफ्ट आणि ज्वेल्लरी हे बनवण्यासाठी देखील होतो .विविध उद्योगांमध्ये याचा वापर केला जातो बांबूच्या पोकळ खत आणि पाणी अतिशय कमी प्रमाणात लागते .या पिकांची रोगप्रतिकारकशक्ती जास्त असल्यामुळे कीटकनाशकांचा वापर देखील कमी प्रमाणात करता येतो.

बांबू लागवडीमधून शेतकऱ्यांचे आर्थिक स्तिथीत सुधारणा होण्यासाठी तसेच देशातील बांबू उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय बांबू मिशन (NBM)ची स्थापना केलेली आहे .

अटल बांबू योजनेचे उद्दिष्ट

अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तिथीत सुधारणा करणे व बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन तयार व्हावे हे उद्धिष्ट आहे .शेतकऱ्यांना टिशू कल्चर रोपांचा पुरवठा करणे.
टिशू कल्चर बांबू प्रजाती
महाराष्ट्रामध्ये मानवेल ,कोकणामध्ये माणगा तर विदर्भ क्षेत्रात कटांग हि प्रजाती मोठ्या प्रमाणावर येते .
वरील तीन स्थानिक प्रजाती व्यतिरिकरत अजून ५ प्रजाती तज्ज्ञांकडून निवडण्यात आलेल्या आहे .त्यांची नवे खालील प्रमाणे आहेत :-

बांबू अनुदान

बांबूच्या रोपांसाठी ४ हेक्टर जमीन असल्यास ८० टक्के अनुदान मिळते तसेच १० एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास ५०% अनुदान थेट शेजाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीच्या स्वरूपात जमा करण्यात येते .

 

अटल बांबू योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बांबूची रोपे मिळावीत यासाठी काही निकष दिलेले आहेत .अर्ज सादर करताना खालील बाबीची पूर्तता करावी .ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येतो
आधार कार्ड प्रत
शेतीचा गाव नमुना सातबारा ,गाव नमुना आठ , गाव नकाशाची प्रत
ग्रामपंचायत/ नगरपरिषद/ नगरपंचायत यांच्याकडून रहिवासी असल्याचा दाखला
बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत
अर्जदार शेतकऱ्याचे आधार बँक खात्याशी जोडणे आवश्यक राहील

बांबू लागवड करत असलेल्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून स्वरक्षण व्हावे तसेच रोपे लहान असताना यासाठी कुंपण असणे आवश्यक आहे झाडांच्या चांगल्या वाढीसाठी ठिबक सिंचन असल्याचे हमीपत्र .
जिओ टॅग/जीआयएसद्वारे फोटो काढल्याचे हमीपत्र
शेतामध्ये विहीर /शेततळे /बोअरवेल असल्याचे हमीपत्र
जे शेतकरी ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार नाहीत त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करू शकतात
ज्या अर्जदारांची निवड होईल त्यांना महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून निवडीबाबतचे पत्र देण्यात येईल .

 

त्यानंतर अर्जदाराने प्रमाणित केलेल्या रोपवाटिकेतून रोपांची खरेदी करुज लागवड करावी . त्यानंतरच महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे अनुदानाची मागणी करावी .त्यानंतर मंडळाकडून रोप लागवडीची पाहणी करण्यात येते व त्यानंतरच अनुदान देण्यात येते .

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम