शेतकऱ्यांनो अशी करा बीट लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १ नोव्हेंबर २०२२ | बीट हे थंड हवामानातील पिक असून बीटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. थंड हवामानात साखरेचे प्रमाण वाढते. जास्त तापमानात मुळांना चांगला रंग येत नाही. तापमान १० अंश सेल्सीअसपेक्षा कमा झाल्यास बीटच्या खाण्यायोग्य मुळाची पुर्ण वाढ न होताच पीक फुलावर येते.
बीटची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतू बीट हे जमिनीत वाढणारे कंदमुळ असल्याने बीटच्या लागवडीसाठी भुसभुशीत आणी पाण्याच्या उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. अतीभारी जमिनीत बीटची लागवड केल्यास मुळाचा आकार वेडावाकडा होतो. बीटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा.
जमिनीचा सामू ९ ते १० पर्यत असणा-या खारवट क्षारयुक्त जमिनीतही बीटचे पिक उत्तम येते. महाराष्ट्रातील हवामानात रब्बी खरीप हंगामातही बीटची लागवड केली जाते.बीट हे थंड हवामानात वाढणारे पिक असून पिकाच्या वाढीसाठी थंड हवामान पोषक असते. बीटच्या रब्बी हंगामातील लागवडीसाठी बियांची पेरणी ऑक्टोबरमध्ये करावी. महाराष्ट्रातील हवामानात बीटचे पीक खरीप हंगामातही घेतले जाते. त्यासाठी बियांची पेरणी जून-जुलै महीन्यात केली जाते. बीटच्या आकारमानाप्रमाणे त्याचे चपटे, गोल, लंबगोल आणि लांब असे प्रकार पडतात. डेट्राईट डार्क रेड आणि क्रिमसन ग्लोब या दोन गोल आकाराच्या जाती भारतात चांगल्या वाढतात.
१) डेट्राईट डार्क रेड- या जातीची मुळे एकसारखी गोल आकाराची, मुलायम असतात. मुळांचा रंग गर्द लाल असतो. मुळातील गराचा रंग रक्तासारखा गर्द लाल असतो. या जातीमध्ये कंदाचा वरील पानांचा भाग कमी असतो. पाने गर्द हिरव्या रंगाची व मरून रंगमिश्रीत असतात. या जातीचे पिक लागवडीनंतर ८०-१०० दिवसांत तयार होते. हा अधिक उत्पादन देणारा वाण आहे.
२) क्रीमसन ग्लोब- या जातीची मुळे गोल चपट्या आकाराची असतात. मुळांचा रंग मध्यम लाल असतो. मुळातील गराचा रंग फीकट लाल असतो. कापल्यानंतर यामध्ये रंगाच्या स्तरांची रचना दिसून येत नाही. पाने मोठी गर्द हिरवी आणि मरून रंगमिश्रीत असतात. कंदाचा वरील भाग मध्यम ते उंच असतो.
३) याशिवाय बीटचे *क्रॉसब्रॉय इजिप्शीयन आणि अर्ली वन्डर* हे उन्नत वाण आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम