जळगाव जिल्ह्यात केळीचा मोठा तुटवडा !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १० फेब्रुवारी २०२३।  यंदा जळगाव जिल्ह्यात केळीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा निर्यातक्षम केळीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं केळीचे दरात मोठी वाढ झाली आहे. भारतातील महाराष्ट्रामधील जळगावच्या केळीची गुणवत्ता आणि चव ही जगाला भुरळ घालणारी आहे. भारतीय केळीला जगभरात मोठी मागणी होत आहे. जागतिक पातळीवर केळीला वाढलेले मागणी पाहता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अत्याधुनिक पद्धतीने शेती करत निर्यातक्षम केळी निर्माण करण्यात यश मिळवलं होतं.

अनेक नैसर्गिक संकट आल्यानं पिकाचं मोठे नुकसान झालं. त्यामुळं कधी नव्हे ते एवढी उत्पादन घट झाल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे. देशात आणि विदेशात मिळून रोज सहाशे कंटेनरची मागणी आहे. मात्र, सध्या केळीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळं केळीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांना नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे, त्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. मागील काही महिन्यात केळी पिकावर आलेल्या विविध संकटांच्या मालिकेमधील चक्रीवादळ,गारपीट आणि सी एमवी व्हायरसचां प्रादुर्भाव झाला आहे. केळी उत्पादनात मोठी घट झाल्याने यंदा जळगावमध्ये 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव मिळत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम