बोर लागवड पद्धत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २५ डिसेंबर २०२२ Iजमीन -हलकी ते मध्यम

जाती-उमराण, कडाका, चुहारा, मेहरुण
लागवडीचे अंतर – ६.० X ६.० मीटर

अभिवृद्धी –
डोळे भरणे
खते –
शेणखत ५० किलो प्रति झाडास छाटणीनंतर द्यावे. २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅम
पालाश प्रति झाड प्रति वर्ष नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.
छाटणी –
बोरांची छाटणी ६० सेमी पर्यंत मुख्य खोड ठेवून ४ ते ६ दुय्यम फांद्या ठेवून छाटणी एप्रिल व मे महिन्यात करावी. खुंटावरील फुट वेळोवेळी काढावी.
किड व रोग नियंत्रण
फळे पोखरणा-या अळी :- बोरीवर फळे पोखरणा-या अळीच्या बंदोबस्तासाठी केनव्हरलेट, २० ई.सी. ५ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ ई.सी ७ मिली किंवा कार्बारील ५० %, २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने कुरतडणारी अळी :- पाने कुरतडणारी अळीच्या नियंत्रणासाठी कार्बारील २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भूरी – बोरीवरील भूरी या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी किंवा पाण्यात मिसळणा-या गंधकाची २० ग्रॅम १० लीटर पाण्यात फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर दर ७ ते ८ दिवसाचे अंतराने वरील प्रकारच्या सात फवारण्या कराव्यात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम