या गावातील म्हैस देते दिवसात ३३ लिटर दुध !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १३ जानेवारी २०२३ । देशात दुधाला खूप महत्व आहे व ते महागही आहे, शेतकरी सुद्धा दुधाचा नियमित व्यापार करीत आहे. पण देशातील या गावातील एक म्हैस तब्बल ३३ लिटर दुध एकाच दिवसात देत असते. तुम्हाला हि घटना एकूण थक्क व्हाल पण हे खरे आहे.

हरियाणातील कैथलच्या बुधा खेडा गावातील म्हैस देशातील सर्वात जास्त दूध देणारी म्हैस ठरली आहे. रेश्मा असं या म्हशीचे नाव असून ही मुर्राह जातीची म्हैस आहे. ही म्हैस एका दिवसात सुमारे 33.8 लिटर दूध देते. इतकी धार काढण्यासाठी कमीत कमी 2 लोक लागतात. या म्हशीला केंद्र सरकारने देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

रेश्मा म्हैस हरियाणातील कैथल जिल्ह्यातील बुधा खेडा गावात आहे. संदीप, नरेश आणि राजेश या तीन भावांनी 4 वर्षांपूर्वी हिसारच्या भगना गावातून 1.40 लाख रुपयांना ही म्हैस खरेदी केली आणि तिचे पालनपोषण केले. गेल्या वर्षी रेश्माने एका रेडकूला जन्म दिल्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून (NDDB) 33.8 लिटर दूध दिल्याबद्दल राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र तिला देण्यात आले. मालकांनी सांगितलं की, रेश्माने पहिल्यांदा मुलाला जन्म दिला तेव्हा तिने 19-20 लिटर दूध दिले. दुसऱ्यांदा आई झाल्यावर तिने 30 लिटर दूध दिले. रेश्मा जेव्हा तिसऱ्यांदा आई झाली तेव्हा तिने 33.8 लिटर दूध देऊन नवा विक्रम केला.

रेशमा म्हशीचे मालक संदीप यांनी रेशमाच्या चाऱ्याबद्दल माहिती देताना सांगितलं की, तिला एका दिवसात 20 किलो पशुखाद्य खायला दिले जाते. ज्यामध्ये मोहरीचे तेल, कोंडा, खनिज, मिश्रण, गूळ इ. गोष्टींचा समावेश असतो. यासोबतच या म्हशीच्या आहारात हिरवा चाऱ्याचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय इतर जनावरांप्रमाणे तिला तोच चारा दिला जातो ज्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम