राज्यात मिरचीला मिळाला चांगला भाव !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १४ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक भागातील शेतकरी लाल मिरचीचा व्यवसाय करीत आहे. त्याच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यापासून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची खरेदीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच बाजार समितीत मिरचीला चांगला भाव मिळत आहे. ओली मिरचीला 2500 ते 5 हजार पर्यंत तर कोरडी मिरचीला 6000 ते 15000 पर्यंतचा भाव मिळत आहे.

paid add

आतापर्यंत आठ दिवसात 35 हजार क्विंटल आवक ही झाली असून रोज 150 ते 200 वाहनातून 3500 ते 4000 क्विंटल मिरची बाजार समिती दाखल होत आहे.यात लाली,गौरी,व्ही. एन. आर इत्यादी मिरचीचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिरचीची लागवड वाढल्याने आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीकडून वर्तवण्यात आली आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीही सारखाच भाव आहे परंतु यावर्षी मजुरी फवारणी व शेतीसाठीचा लागणार इतर खर्च वाढल्यामुळे भाव चांगला असून देखील शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.तसेच कमी पावसामुळे मिरचीची आवक कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आज रोजी जरी मागच्या वर्षी सारखाच भाव असला तरी देखील कमी पावसामुळे तसेच इतर खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे त्यामुळे मिरचीला वाढीव भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे…

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम