गुजरात ,कर्नाटकात कापसाला मिळतोय चांगला भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | सध्या देशात कापूस व्यापार बऱ्यापैकी सुरू झाला आहे. सध्या कापसाला चांगल्या भावाबरोबरच चांगली मागणीही मिळत आहे. कापूस उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. उबदार कपडे आणि उच्च दर्जाच्या कपड्यांमध्ये कॉटनचा वापर केला जातो. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, बिहार ही राज्ये देशातील कापूस उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये येतात. देशात कापून उत्पादनामध्ये सर्वात मोठे राज्य असलेल्या गुजरात मध्ये कापसाची मागणी वाढत आहे गुजरात राज्यातील जुनागड मध्ये कापसास किमान दर हा 8700 प्रतिक्विंटल तर कमाल दर हा 9475 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला आहे. सर्वाधिक दर हा कर्नाटक राज्यातील हवेली बाजारात मिळाला असून 9580 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक भाव मिळत आहे.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम