कृषी सेवक । ५ फेब्रुवारी २०२३। राज्यातील हवामानाचा शेतकरी अंदाज घेत घरात साठविलेला कापस विकण्यास सुरुवात केली आहे. पण काही भागात शेतकरीला आजही कमी भाव मिळत आहे. पण गेल्या वर्षी कापसाला प्रतिक्विंटल 13 हजारांचा विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे यावर्षीही देखील कापसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांचा अंदाज प्रारंभीपासूनच सपशेल चुकला असून सातत्याने दरात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यावर्षी सुरुवातीलाच सात हजारांच्या आसपास दर होता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेने घरातच कापूस साठवून ठेवला होता. अशात काही दिवसांपूर्वी कापसाला 7 हजार 700 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. त्यानंतर गुरुवारी औरंगाबादच्या सोयगावच्या बाजारात या दरात वाढ होऊन 8 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पण दोनच दिवसांत शनिवारी 300 रुपयांनी पुन्हा दरात घसरण झाली आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम