गवती चहा लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २३ नोव्हेंबर २०२२ | गवती चहाची लागवड वर्षभर करता येते.

लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी.
लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
लागवडीसाठी ओडी-440, सीकेपी-25, आरआरएल-16 या जातींची निवड करावी.
लागवड 75 सें.मी. बाय. 75 सें.मी. अंतराने करावी. हेक्‍टरी 22 हजार ठोंब लागतात.
लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी करावी.
त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करावी.
पहिल्या दोन वर्षांत हेक्‍टरी 20 टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते.
गवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे प्रमाण 75 टक्के असते.
यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते.
तेल रंगाने पिवळसर असून, त्याला लिंबासारखा वास असतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम