शेतकऱ्याना मिळतोय द्राक्षाचा इतका दर !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १५ जानेवारी २०२३ ।  राज्यात दर्जेदार द्राक्षाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरात यंदा दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन होणार आहे. द्राक्ष बागांसाठी यंदाचे हवामान अनुकूल राहिले. वादळी वारे, पाऊस, अति थंडी, अति उष्णता, असे टोकाचे हवामान नव्हते. त्याचा परिणाम म्हणून यंदा द्राक्षांचा दर्जा चांगला राहिला आहे, उत्पादनही वाढणार आहे. द्राक्षांचा दर्जा ही उत्तम असणार आहे.

सध्या अल्प प्रमाणात विक्रीसाठी द्राक्षे तयार झाली आहेत. सध्या चार किलोच्या पेटीला शेतकऱ्यांना दोनशे रुपयांचा दर मिळत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्षाचा मुख्य हंगाम सुरू होईल. तासगाव तालुक्यात यंदा दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

सुपर, एसएस,अनुष्का जातीच्या चार किलोच्या पेटीला २००, तर सोनाक्का, माणिक चमन जातीच्या द्राक्षांना १६५ ते १७० रुपयांचा दर मिळत आहेत. हा शेतकऱ्यांना मिळणारा दर आहे. दक्षिण भारतातील व्यापारी तासगाव परिसरात येण्यास सुरुवात झाली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम