राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक ; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १५ ऑक्टोबर २०२३

राज्यातील मराठवाडयात अनेक शेतीचे गोगलगाईच्या प्रार्दुभावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे तर कापूस, सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

paid add

गोगलगाईंचे उच्चाटन करण्यात सरकारी यंत्रणांना अपयशी ठरली आहे. यामुळे कापूस, सोयाबीन पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केल्याचे समोर आले आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. कापसाचा दर्जा चांगला असताना ५४०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे. तर सोयाबीनचा हमीभाव ४६०० रुपये आहे, मात्र यापेक्षा ५०० ते ७०० रुपये कमी भाव शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे सरकारने हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठवाडयात ५५ हजार हेक्टर क्षेत्राला गोगलगाईचा फटका बसला आहे. त्यामुळे मराठवाडयातील शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांसाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम