कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ | पपईची लागवड आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल व बिहार इत्यादी राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर होते. आणि फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, पुणे, सातारा, जालना, सोलापूर या व इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पपईची लागवड केली जाते. 1- पुसा डेलिशियस( पुसा 1-15)- या जातीचे पपईचे झाड जास्तीत जास्त सात ते साडेसात फूट उंच वाढते व लागवडीपासून 8 महिन्यात फळे लागतात. या जातीच्या एका झाडावर नर आणि मादी असे दोन्ही प्रकारचे फुले असतात.
या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीला जमिनीपासून अवघ्या अडीच ते पावणेतीन फुटांवर फळे लागायला सुरुवात होते. या जातीच्या फळांची प्रत उत्कृष्ट असल्यामुळे बाजारपेठेत भाव देखील चांगले मिळतात. या जातीच्या फळांचा आतील गर नारिंगी असतो व चव व स्वाद उत्तम असतो. फळांचा आकार मध्यम व मोठा तसेच गोलाकार लांबोळी असतात. एका फळाचे वजन एक ते दोन किलोपर्यंत भरते.
पुसा मॅजेस्टी (पुसा 22-3)- या जातीचे झाडे सहा ते साडे सहा फूटपर्यंत वाढते. या जातीच्या रोपांची लागवड केल्यापासून पाच महिन्यात जमिनीपासून दीड फूटावरून फळधारणा व्हायला सुरुवात होते. या जातीची फळे मध्यम, आकाराने गोलाकार तसेच गर हा घट्ट पिवळसर असतो.
साडेतीन सेंटीमीटर जाडीचा गर या जातीच्या फळाचा असून फळे एक किलो पासून तीन किलो पर्यंत असतात. या जातीच्या फळांमध्ये टिकाऊपणा जास्त असल्यामुळे साठवणुकीत फळे खराब होण्याचे प्रमाण नगण्य असते.
पुसा जायंन्ट ( पुसा 1-45 व्ही)- या जातीच्या पपईचे झाडे सात ते साडेसात फूट उंच वाढते व लागवड केल्यापासून साडेआठ महिन्यानंतर जमिनीपासून तीन फुटांवर फळे लागायला सुरुवात होतात. या जातीच्या पपईच्या झाडाचे खोड मजबूत असल्यामुळे वाऱ्यामध्ये झाड पडत नाही. या जातीची फळे आकर्षक व मोठी असतात तसेच एका फळाचे वजन सव्वा ते तीन किलो वजना पर्यंत भरते. या जातीच्या फळांचा उपयोग भाजी व फॅनिंगसाठी केला जातो.या जातीच्या फळांचा गर नारिंगी रंगाचा असतो व जाडी 5 सेंटिमीटर असते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम