शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : १५ वा हफ्ता मिळण्यासाठी हे कराच !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ९ ऑक्टोबर २०२३

देशभरातील शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा देण्यासाठी केद्र व राज्य सरकार विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देत असते. त्यात केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 14 हप्ते मिळाले आहे. तर पंधराव्या हप्त्यासाठी सरकारने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेच्या (PM Kisan Yojna) पंधराव्या हप्त्यासाठी सरकारने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शेतकरी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

या योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्यावे.

शेतकरी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) जाऊन ई-केवायसी करू शकतात.
ई-केवायसी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अर्ज भरताना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. जसं की, अर्ज भरत असताना शेतकऱ्यांना लिंग, नाव, आधार क्रमांक, पत्ता इत्यादी गोष्टी अचूक रित्या भराव्या लागणार आहे.

या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळली तर शेतकऱ्यांना या योजनेतील पंधराव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. पीएम किसान योजनेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर फोन करू शकतात. त्याचबरोबर [email protected] या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम