‘सफरचंद’च्या शेतीचा कसा झाल उगम ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १७ नोव्हेबर २०२३

प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी नेहमीच सफरचंद हे फळ उत्तम मानले जात असते. या फळामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असणारे घटक असून अनेक आजारांवर सफरचंद फायदेशीर असते. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. गुणकारी सफरचंदाचा उगम कधी आणि कुठे झाला? हे तुम्हाला माहिती आहे का? कशी बहरली हिमाचलची ओळख असणाऱ्या सफरचंदाची शेती?

paid add

सफरचंद 4000 वर्षांपूर्वी मध्य पूर्वमध्ये आले. सफरचंदाचे सत्यानंद स्टोक्स यांना हिमाचलमधील जनक मानले जाते. त्यांनी भारतात 1916 मध्ये अमेरिकेतून सफरचंदाचे रोपटे आणले, ज्याची लागवड त्यांनी शिमला जिल्ह्यातील “ठाणेदार” नावाच्या गावात केली. तेव्हा हिमाचलमध्ये सफरचंदाचे उत्पादन “रॉयल” आणि “रेड डिलिशियस” नावाच्या सफरचंदांच्या जातींपासून सुरू झाले होते. 2023 मध्ये हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या व्यावसायिक लागवडीला तब्बल 107 वर्षे पूर्ण झाली असून हिमाचल प्रदेशच्या आर्थिक ताकदीमध्ये सफरचंदाच्या महत्त्वामुळे या राज्याला “ऍपल स्टेट” अशी ओळख मिळाली. संपूर्ण देशातील सफरचंदांपैकी 35 टक्के सफरचंद फक्त हिमाचलमधून खरेदी करतात. राज्यात या फळाची व्यावसायिक लागवड किन्नौर, मंडी, शिमला, कुल्लू, चंबा आणि सिरमौर जिल्ह्यात करतात.

हिमाचलचे सफरचंद हे  अतिशय महत्त्वाचे पीक असून हिमाचल प्रदेश सरकार फलोत्पादन विभागानुसार, राज्यात फळांचे उत्पादन 7.97 लाख मेट्रिक टन इतके आहे. क्षेत्रावर नजर टाकायची झाली तर राज्यातील एकूण ३.२७ लाख बागायती क्षेत्रापैकी २.३५ लाख हेक्टर क्षेत्रात फळांचे उत्पादन होते. राज्यातील फळांची उत्पादकता ३.४ मेट्रिक टन प्रति हेक्टर इतके आहे. हिमाचल प्रदेशला ‘फ्रूट बाउल ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. हे राज्य विविध प्रकारच्या फळांसाठी प्रसिद्ध असून आर्थिक सर्वेक्षण, 2022-23 नुसार, 2021-22 मध्ये फळांचे एकूण उत्पादन 7.54 लाख टन इतके झाले होते, जे आर्थिक वर्ष 2022 मध्ये 7.93 लाख टन इतके झाले आहे. त्यापैकी 2021-22 या वर्षात फळांच्या एकूण क्षेत्रफळाच्या 48.80 टक्के आणि फळांच्या एकूण उत्पादनाच्या 81 टक्के वाटा सफरचंदाचा होता. 1950-51 मध्ये सफरचंदाखालील एकूण क्षेत्र 400 हेक्टर तर ते 1960-61 मध्ये 3025 हेक्टर पर्यंत वाढले. 2021-22 मध्ये हा आकडा वाढून 115016 हेक्टर इतका झाला. हिमाचलमधील सफरचंद अर्थव्यवस्था एकूण 5000 कोटी रुपये इतकी आहे आणि तब्बल 1.5 लाख शेतकरी कुटुंबे त्याच्याशी निगडीत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम