थंडीमुळे या रोगापासून दूर ठेवा पिक !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १८ जानेवारी २०२३ । देशासह राज्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकरीच्या पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याचे अंदाज बांधला जात असतांना काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली गेला आहे. तर काही ठिकाणी उणे तापमानाची नोंद देखील झाली आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी पिकांवर दव पडलं आहे. याचा फटका शेती पिकांना बसत आहे. पिकांवर दव पडल्यानंतर शेतकऱ्यांनी नेमकी उपायोजना काय करावी?

कडाक्याच्या थंडीचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. थंडीमुळे पिकांवर कुठे बर्फ तर कुठे दव पडत आहे. याचा मोठा फटका पिकांना बसत असून उत्पादनात घट येत आहे. सध्या उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहेत. राजस्थानमध्ये पिकांवर मोठ्या प्रमाणावर दव पडले होते. त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील पिकावर दव पडले आहे. दव पडल्याने गहू, कोथिंबीर, वाटाणा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील संगापूर परिसरात तापमानाचा पार 3 अंशांच्या खाली पोहोचला आहे. वाटाणा आणि कोथिंबिरीच्या पिकांवर बर्फाचा थर दिसून येत आहे. थंडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. काही भागात पिकांचेही नुकसान झाले आहे.

दवापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. पिकावर दव रोखण्यासाठी एक हजार लिटर पाण्यात एक लिटर सल्फ्युरिक अॅसिड मिसळून द्रावण तयार करा. या तयार केलेल्या द्रावणाची पिकांवर फवारणी करावी. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळता येईल असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अति थंडी शेती पिकांसाठी अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अती थंडी आणि दव यामुळे वनस्पतींच्या पेशींमध्ये पाणी गोठते. पेशींमध्ये पाणी गोठल्यानंतर पिकांची वाढ घटते. थंडीमुळे झाडांची पाने, कोंब, फुले, फळे यावर मोठा परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. राजस्थानमध्ये तापमान झपाट्याने घसरत आहे. जोधपूरमध्ये अनेक ठिकाणी पिकांवर बर्फाचा थर साचला आहे. त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातही थंडीचा पिकांवर परिणाम, शेतकरी चिंतेत वाढत्या थंडीचा महाराष्ट्रात देखील पिकांवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. हरभरा, कापूस, केळीसह विविध पिकांवर थंडीमुळे रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम