कृषी सेवक I २३ डिसेंबर २०२२ Iआज आपण निरा/शिंदी लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती पाहूया.नीरा शिंदी हे थंड शित पेय तसेच याचे आयुर्वेदिक महत्त्व आहे त्यामुळे या शीत पेयाला १२ महीने चांगली मागणी असते म्हणून शेतकरी बांधवांनी या पिकाकडे वळणे गरजेचे आहे यातून कमी खर्च व कमी मेहनत करून 90 वर्ष पर्यंत उत्पादन मिळवू शकता.
थोडक्यात निराची काही फायदे आपण पाहूया नीरा हे एक थंड व शीतपेय म्हणून ओळखलं जातं त्याला १२ महिने प्रचंड मागणी आहे यामध्ये मिनरल्स कॅल्शियम असते पोटाचे विकार मुतखडा इत्यादी आजारावर हा उपयोगी मानला जातो,हाडे मजबूत होतात तसेच शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
लागवड खर्च व उत्पादन : – साधारण याची लागवड १०x१० वर करावी एकरी ४०० रोप बसतील एक रोपांची किंमत १०० रुपये ते 140 रुपये आहे.
लागवड खर्च :- १ रोप किंमत १०० ते १२०
लागवड अंतर= १०x१० =४०० रोपे लावावीत.
४००x१००=४०,००० हजार रू रोप.
लागवड मजुरी ५,००० हजार
इतर खर्च खते = ५,००० हजार
—————————————
एक एकर चा खर्च साधारण ५०,००० हजार.
एकदा खर्च व लागवड केल्यास सलग ९० वर्ष उत्पन्न मिळु शकते
धुऱ्यांनी तसेच बांधांनी पडीक जमीनीत याची लागवड करता येवू शकते.
उत्पन्न :- या पिकाला वर्षभरातून आठ महिने उत्पादन घेता येऊ शकते राहिलेले चार महिने हा झाडांना विश्रांतीचा काळ असतो एका झाडापासून साधारण
1 लिटर निरा मिळतो साधारण 1 लिटर निराला 75 रुपये ते 80 रुपये भाव मिळतो
१ लिटर प्रती झाड
४०० झाडाना प्रती लिटर धरले तर ४०० लिटर परडे उत्पन्न मिळू शकत वर्ष भर अंदाजे ४ ते ५ लाख उत्पन्न मिळू शकते ?
या पिकाला इतर कुठलाही खर्च नाही झिरो मेंटेनन्स आहे एकंदरीत म्हणजे याला रासायनिक किंवा इतर फवारणी किंवा खते इतर खर्च कुठला नाही तर आपल्याकडे अवेलेबल असेल तर शेणखत आपण टाकू शकता याला जनावरे खात नाहीत किंवा वानरांचा त्रास नाही त्यामुळे हे पीक कमी पाणी कमी खर्च आणि अधिक सलग 90 वर्षापर्यंत उत्पादन घेता येऊ शकते तरी या अशा मूल्यवान पिकाची लागवड करून शेतकरी बांधवांनी आपले उत्पादन वाढवण्यास मदत करू शकतात हे पीक ज्यांना पाण्याची कमतरता आहे ज्यांची जमीन पडीक आहे किंवा माळरान असेल ज्यांना शेतीकडे जास्त लक्ष देणं होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायी पीक मानलं जातं तरी याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लक्ष देऊन या पिकाकडे वळणे अधिक फायदाचे आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम