राज्यातील नर्सरी व्यवसाय धोक्यात !

बातमी शेअर करा

कृषीसेवक| २ सप्टेंबर २०२३ | राज्यात कृषीविषयक असलेल्या सर्वच व्यावसायिकांना यंदा मोठा फटका बसला आहे. त्याचे कारण देखील तसेच काही आहे. राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दांडी मारली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगल्या मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान पाऊस नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे पाऊस नसल्याने नर्सरी मधील रोपांची कोणीही खरेदी करत नाही तर दुसरीकडे रोपवाटिका जगवण्यासाठी शेतकरी टँकरने पाणीपुरवठा करतायेत. त्यामुळे आता नर्सरी चालक दुहेरी संकटात सापडले आहेत.

पाऊस नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान बार्शी तालुक्यातील वाणेवाडी या ठिकाणी सचिन लोखंडे यांनी पाच वर्षांपासून रोपवाटिका सुरू केली. यावर्षी त्यांच्या रोपवाटिकेमध्ये जवळपास 70 ते 80 हजार रोपे होती. मात्र पाऊसच नसल्याने आता यांच्यावर रोपवाटिकेमध्ये फक्त दहा ते वीस हजार रुपये शिल्लक राहिली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे आंबा, जांभूळ, सीताफळ, लिंबू, पेरू अशी अनेक रोपे अक्षरशः उध्वस्त झाले असल्याची माहिती या रोपवाटिका चालकाने दिली आहे. दरवर्षी वीस ते पंचवीस लाखांचे उत्पन्न या रोपवाटिकेतून मिळत होतं. मात्र या वर्षी रोपांचा खर्च निघणे अवघड झाल्याची माहिती रोपवाटिकेचे मालक सचिन लोखंडे यांनी दिली आहे. सचिन लोखंडे यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवस रोपे जगण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला मात्र आता तो खर्च देखील निघणे अवघड झाल आहे. त्याचबरोबर विहीर, बोर आटले आहे. त्यामुळे रोपवाटिका जगवणे अवघड झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम