कृषी सेवक । १४ फेब्रुवारी २०२३। प्रत्येकाच्या दैनंदिन आहारातील महत्वाचा घटक म्हणजे कांदा. पण हा कांदा सध्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱयाकडून कांदा पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले जात असून सध्या येथील बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने शेतीकरातून संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक मधील लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती, नाशिक बाजार समिती, यांसह येवला, मनमाड, उमराणे अशा बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नाशिक मध्ये साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान लाल कांदा बाजारात येऊ लागतो. लाल कांद्याची आवक बघून बाजार समितीमध्ये कांद्याचे दर व्यापारी ठरवले जातात. मात्र, यंदाच्या वर्षी 2 ते 3 हजारापर्यंत असणारे लाल कांद्याचे दर आता 1 हजाराच्या खाली येऊन ठेपले आहे. लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800 रुपये पर्यंतखाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने चिंताग्रस्त झाला आहे.
कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करावी लागत असल्याने उत्पादन खर्च कसा मिळवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. बाजार समितीमध्ये आल्यानंतर कांद्याची किंमत अत्यंत कवडीमोल भावात व्यापारी करत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगावची ओळख आहे. या ठिकाणीच वाईट परिस्थिती निर्माण झाली असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक झाली असल्याने कांद्याने दर पडले आहेत. मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतल्यानंतर चांगला दर मिळाल्यास जास्त पैसे मिळतील अशी आशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र. लाल कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकीकडे चिंतेचे वातावरण आहे तर दुसरीकडे त्याच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. लाल कांद्याचे भाव सरासरी 900 रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामध्ये किमान बाजारभाव 200 ते जास्तीत जास्त 1200 रुपयांपर्यंत भाव आले आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम