कांदा उत्पादक शेतकरी सापडला संकटात !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २९ जानेवारी २०२३ ।  देशातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडलेला आहे. नेहमी बदलणाऱ्या हवामानाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे. बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका बसत आहे. पिकांवर रोगराई पसरत असल्यानं पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. गहू, हरभऱ्यानंतर आता कांदा उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. कारण बदलत्या हवामानाचा कांदा पिकावर देखील मोठा परिणाम होताना दिसत आहे. देशात कधी थंडीची कडाका तर कधी पाऊस पडत आहे. हे हवामान पिकासाठी योग्य नसल्यानं पिकांवर परिणाम होत आहे. देशाच्या विविध राज्यांसह महाराष्ट्रात कधी थंडीचा कडाका तर कधी पाऊस पडत आहे.

वाढत्या थंडीचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत आहे. गहू, हरभरा, मोहरीनंतर आता कांदा पिकाला देखील वाढती थंडी आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. गतवर्षी खरीप हंगामात पूर आणि पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी पिकावर आहेत. खरीपानंतर रब्बी हंगामातील पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. कारण एका बाजूला कडाक्याची थंडी पडत असताना दुसऱ्या बाजूला पाऊस पडत आहे. देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी दव आणि पावसामुळं यामुळं पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम