कांद्या उत्पादक शेतकरी चिंतेत ; दर घसरले !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ११ फेब्रुवारी २०२३।  राज्यातील कांद्या उत्पादक मोठ्या चिंतेत आल्याची बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली असून लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800 रुपये पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु दर घसरल्यापासून शेतकरी व्यथा बोलून दाखवत आहेत.

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत आहे, तसेच विदेशात निर्यातीला ही अपेक्षित मागणी नसल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज 800 वाहनातून 16 हजार 200 क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. या कांद्याला जास्तीत जास्त 1380 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 960 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव जरी मिळताना दिसत असेल मात्र सरासरी 600 ते 800 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे.

बाजार भावात उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी निघणे मुश्किल झाले आहे, एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च झाला 30 ते 40 हजार रुपये सुद्धा मिळणार नसल्याने तोट्यात कांदा विक्री करावे लागत आहे. घरात लग्न कार्य कसे करावे यासह अनेक समस्या शेतकरी कुटुंबाला भेडसावत असल्याने पंधराशे ते दोन हजार रुपये सरासरी बाजार भाव मिळाला पाहिजे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी प्रदीप न्याहारकर करत आहे. कसमादे पट्ट्यात यंदा कांद्याचे पीक जोमदार आहे. परंतु धुक्याच्या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. या हवामानाचा चांगलाच धसका शेतकरी यांनी घेतला आहे. अत्यंत कष्टातून उभारलेले हे पीक ढगाळ वातावरणामुळे खराब होण्याची भिती निर्मिण झाली आहे. कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत मोठे कष्टाचे पीक आता झालेले आहे. गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरण, धुके व सकाळी दव पडत असल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान होते की काय? या काळजीत कांदा उत्पादक आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम