राज्यातील कांदा प्रश्न पेटला : मंत्री गोयल काढणार मार्ग ?

बातमी शेअर करा

कृषीसेवक |२६ सप्टेंबर २०२३

राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संतापले असून आता पुन्हा एकदा वादंग निर्माण झालं आहे. गेल्या सात दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्णतः बंद आहेत. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले आहेत. या मुद्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर विरोधकांनी सरकारवर टीका केलीय.

गेल्या सात दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत. यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा सडत आहे. याबाबत शासन आणि नाफेडचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली आहे. तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहीती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यासंदर्भात मंत्री पियुष गोयल हे संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिगृहावर बोलणार असल्याचे भुजबळ म्हणाले. कांदा व्यापारी अचानक संप करुन शेतकऱ्यांना वेटीस धरत आहेत.त्यांच्यामुळं शेतकऱ्यांचा कांदा सडायला लागला आहे. त्यामुळें आम्ही लवकरच या व्यापाऱ्यांवर निर्बंधासाठी नियमावली करत असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. मनात आलं की संप करायचा हे चालणार नाही असेही सत्तार म्हणाले. आम्ही मार्केटिंग फेडरेशनला उतरवून कांदा खरेदी करु, म्हणजे संप जरी व्यापाऱ्यांनी केला तरी शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. केंद्राला कधी कोणता कांदा मार्केटमध्ये उतरवायचा हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळें नाफेड आणि एनसीसीएफ कांदा मार्केटमध्ये उतरवन बंद करा ही मागणी मान्य होणारी नाही असंही सत्तार म्हणाले. पीयुष गोयल हे मुंबईत आहेत. त्यांना मी भेटणार आहे. 40 टक्के टॅक्स रद्द करावा ही मागणी आहे. व्यापारी फी एक रुपयांच्या ऐवजी 50 पैसे घ्यावी अशी मागणी आहे. आज सात वाजता यावर निर्णय होणार असल्याचे सत्तार म्हणाले. आज सात वाजता यावर तोडगा निघेल. यावर निर्णय झाला नाही तर मार्केटींग फेडरेशन कांदा खरेदी करेल असे सत्तार म्हणाले. आम्ही चाळीवर जाऊन कांदा खरेदी करु असे सत्तार म्हणाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम