कांद्याच्या दरात सुधारणा ; शेतकऱ्यांना दिलासा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | राज्यात कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे. राज्यातील अनेक बाजार समितींमध्ये किमान भाव 1800 रुपयांवरून 2000 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु सध्या अनेक शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

paid add

राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या घसरलेल्या भावाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यातील मंडईंमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे त्यांना आता नुकसान भरून काढण्याची आशा निर्माण झाली आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि नागपूर जिल्ह्यात कांद्याने सरासरी 17-19 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा खर्च वसूल झालेला नाही. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती. बाजारात चांगला दर मिळाल्यावर विक्री करू, असे शेतकऱ्यांना वाटले. मात्र पावसात कांदे सडले, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे आता कांदा विक्रीसाठी नाही. अशा परिस्थितीत त्यांचे नुकसान भरून निघणार नाही.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम