पपईचे दर उतरले ; शेतकऱ्यांची चिंता वाढणार ?

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १४ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक शेतकरीवर नेहमीच संकट येत असतांना आणखी एकदा पपई उत्पादक शेतकरी संकटात येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून नव्या हंगामातील पपईची आवक सुरू आहे. दर टिकून असून, जागेवर प्रतिकिलो २० ते २१ रुपये असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. पपईचे आगार असलेल्या नंदुरबारमधील शहादा तालुक्यात आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. मध्यंतरी पपईचे दर दोन ते तीन दिवस ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो, असेही शेतकऱ्यांना मिळाले.

paid add

मागील वर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पपईचे दर १८ ते २० रुपये प्रतिकिलो, असे होते. परंतु यंदाचे दर किमान २० रुपये प्रतिकिलो, असे आहेत. पपईची मागणी पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा या भागांत आहे. तेथे रोज १०० ते १२० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची मागणी आहे. परंतु खानदेशात सध्या रोज फक्त ६० ते ६५ ट्रक पपईची आवक होत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रतिदिन सरासरी १०७ ट्रक पपईची आवक झाली होती. पपईला चांगला उठाव उत्तरेकडे आहे.

कारण थंड वातावरण तयार झाले आहे. पपईची सर्वाधिक लागवड खानदेशात शहादा तालुक्यात केली जाते. तेथे यंदा सुमारे ५२०० हेक्टरवर पपईची लागवड झाली होती. परंतु पिकात प्रतिकूल वातावरणामुळे विषाणूजन्य रोग फोफावले. रोग आटोक्यात न आल्याने पिकाची हानी झाली आहे. हवे तसे उत्पादन हाती आलेले नाही. यामुळे आवकेवर परिणाम झाला आहे. खानदेशात पपईची एकूण लागवड सुमारे सव्वाआठ हजार हेक्टरवर झाली होती.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम