सोयाबीन उत्पादक शेतकरी ‘या’ कारणाने आला अडचणीत !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १० ऑक्टोबर २०२३

राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीनचा पेरा केला जातो. पण यंदा मात्र हे सोयाबीन येलो मोझँक रोगामुळे अडचणीत आले आहे. सोयाबीनवर मोझँक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

यंदा सोयाबीनने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात जवळपास ७० टक्के सोयाबीनची लागवड केली जाते. मात्र सोयाबीन पिकावर मोझँकचा अटॅक झाल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे एकरी चांगले उत्पादन घेण्यासाठी १५ ते २० हजार खर्च केला आहे. मात्र या शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांचे देखील सोयाबीन मधून उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. तसंच काही शेतकऱ्यांनी पीकावर रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोयाबीनवर मोझँक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाचे दाने भरले नाहीत. यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. लागवडीसाठी आणि पेरणीसाठी भरपूर खर्च केला आहे. त्यामुळे जवळ असणारे पैसे देखील खर्च केले आहेत. यामुळे सरकारने आता काहीतरी मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत. दिवाळी सण तोंडावर आला आहे. आणि त्यात सोयाबीनचे उत्पादन घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी रब्बीसाठी आणि सणासुदीला देखील जवळ पैसे नाहीत, त्यामुळे सरकारने दिवाळी आधी काहीतरी मदत द्यावी, अशीही मागणी शेतकरी करत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम