राज्यातील २९ तालुक्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १ ऑक्टोंबर २०२३

देशातील अनेक भागात पावसाचा हाहाकार सुरु होता पण राज्यातील अनेक जिल्ह्यात कमी प्रमाणात पाणी पडल्याने अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण अजूनही अनेक भागात सरासरी एवढं पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. तसेच, मराठवाड्यातील 76 तालुक्यांपैकी 29 तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, छत्रपती संभाजीनगर विभागात सप्टेंबर महिन्यात सरासरी 199.9 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

बीड‎ जिल्ह्यात : बीड तालुका 45.9 टक्के, पाटोदा 46.6, माजलगाव 47.3,‎ अंबाजोगाई 49, परळी 36, धारूर .5.7, वडवणी 33.6, शिरूर‎कासार 51.4 टक्के पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात : चाकूर‎ तालुक्यात 58.2, रेणापूर 66.6 टक्के पाऊस झाला.  छत्रपती‎ संभाजीनगर जिल्ह्यात : पैठण 45.9, वैजापूर 53.7, खुलताबाद‎ 46.3, सिल्लोड 55.7, फुलंब्री 47.5 टक्के पाऊस झाला.‎ जालना जिल्ह्यात : भोकरदन 53.7, जालना 47, अंबड 52.2, ‎परतूर 39.7, बदनापूर 47, मंठा 40.1 टक्के पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील: धाराशिव 64.3, तुळजापूर 66.9, कळंब‎ 68.7, वाशी 68.6 टक्के पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील: परभणी 45.5 गंगाखेड 65.2, पाथरी 43.7, पूर्णा 49.4, सेलू ‎44.7, मानवत 43.8 टक्केच पाऊस झाला आहे.‎

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम