कृषीसेवक | १९ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक शेतकरी फळाची बाग करीत असतात, पण अनेक विविध युक्ती वापरून मोठे उत्पन्न घेत असतात, पण काहीना आर्थिक फायदा होत नसल्याने फळ बाग करीत नाही पण एका शेतकऱ्याने चिकूच्या फळबागेतून चांगले पैसे कमावले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील बोरी या गावचे धोंडू कुंडलिक चनखोरे यांच्याकडे 45 एकर वडिलोपार्जित शेती आहे. मात्र पारंपारिक पिकांना जोड म्हणून कमीत कमी खर्चात शास्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी त्यांनी चिकू पिकाची निवड केली आणि त्यांनी चिकूची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
आपल्याला कोणत्याही पिकाची लागवड करायची म्हटली तर त्याची आधी माहिती असणे गरजेचे आहे. तसेच धोंडू कुंडलिक चनखोरे यांना देखील चिकू याविषयी जास्त माहिती नव्हती त्यामुळे त्यांनी सन 2000 मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाला भेट दिली व त्या ठिकाणी चिकू पिकाविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांनी काही शेतकऱ्यांचा देखील अनुभव जाणून घेतला आणि त्यानंतर त्यांनी चिकू लागवड केली.चिकूची लागवड करण्यासाठी त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून चिकूची कलमे आणली व 33 बाय 33 फूट अंतरावर याची लागवड केली. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही फळबागेची लागवड करायची असेल तर वाणांची निवड योग्य असावी. धोंडू कुंडलिक चनखोरे या शेतकऱ्याने देखील चिकूची लागवड करण्यासाठी कालीपत्ती या चिकूच्या वाणाची निवड केली व आज सहा एकर मध्ये त्यांची बाग दिमाखात उभी आहे.
जर योग्य खत व्यवस्थापन केले तर आपल्याला पिकांमधून उत्पन्न देखील चांगले मिळते. तसेच या शेतकऱ्याने देखील बागेसाठी खत व्यवस्थापन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. यामध्ये शेणखत व गांडूळ खतांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी जास्त केला. या शेतकऱ्याने लागवड केल्यापासून पहिल्यांदा सहा ते सात वर्षापर्यंत झाडावर कोणत्याही प्रकारचे फळ लागले नाही. मात्र त्यानंतर झाडांनी फळ धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रत्येक झाडापासून 50 किलो पर्यंत फळ मिळायचे आता एका झाडापासून 300 ते 400 किलो पर्यंत फळ मिळत आहे.
शेतकरी बुलढाणा व तेथील परिसराशिवाय मध्य प्रदेशातील रायपूर, जबलपूर आणि बिलासपूर या ठिकाणी देखील चिकू विक्रीसाठी पाठवतात. त्या ठिकाणी चिकूला चांगली मागणी असते. त्याचबरोबर त्यांचे अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांसोबत संबंध चांगले असल्यामुळे त्या ठिकाणी देखील दर चांगला मिळतो. त्यामुळे त्यांना नफा देखील यामधून चांगला मिळत आहे. त्यांनी चिकू बागेच्या जोरावर दहा एकर जागा घेतली असून गाव मध्ये दोन घरे देखील घेतली आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम