शेतकऱ्याने फिरविला भरल्या शेतात फिरविला रोटर

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २१ ऑगस्ट २०२३ | 

देशभरातील अनेक राज्यातील शेतकरीना उत्पन्न चांगले मिळाले नसल्याने अनेक ठिकाणी शेतात रोटर फिरविण्याची वेळ शेतकरीवर येवू लागली आहे. हि घटना पुन्हा एकदा महराष्ट्रात घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील तळवाडे येथे एका शेतकरीने आपल्या पपईच्या शेतात रोटावेटर फिरविला आहे.

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी तानाजी दोंड यांनी अगतिक होत दोन एकरातील पपईच्या बागेवर रोटर फिरविला मोठ्या उमेदीने लावलेल्या पपई बागेसाठी नाशिकहून त्यांनी एका नर्सरीतून रोपे आणली होती. लागवडीच्या टप्प्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. साधारणतः सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना खात्री होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने बाग करपू लागली. शेततळ्यातील पाण्यावर कशीबशी उभी राहिलेली बागेला फुलोरा बहरला होता. मात्र पाण्याची कमतरता भासू लागल्याने बहरात आलेली झाडे कोमेजू लागल्याने तानाजी दौंड विवंचनेत होते.अखेर नाईलाजाने तानाजी दौंड यांनी शेतात रोटावेटर चालवत दोन एकर असलेली पपईची बाग उद्ध्वस्त केली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम