देशातील काही राज्यात हवामान बदलले !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २० नोव्हेबर २०२३

देशातील अनेक राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी हैराण झाले आहे तर कधी थंडी, कधी पाऊस तर नागरिकांना देखील कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होताना दिसतोय. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात घट झाली असून लोकांना थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये आज म्हणजेच सोमवारी २० नोव्हेंबर सकाळी धुके दिसले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत अंदमान निकोबार, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर भागात पावसाची शक्यता आहे. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत आज म्हणजेच सोमवारी (20 नोव्हेंबर) कमाल तापमान 27 अंश आणि किमान तापमान 13 अंश राहण्याची शक्यता आहे. याआधी दिल्लीबाबतच्या आपल्या अंदाजात हवामान खात्याने म्हटले आहे की, 23 नोव्हेंबर रोजी दिल्लीचे किमान तापमान 10 अंशांपर्यंत पोहोचेल, त्यानंतर थंडी आणखी वाढेल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम