कृषीसेवक ९ नोव्हेबर २०२३ | भारत हा कृषिप्रधान देश असून आपल्याकडे पशुधनाचे फार महत्त्व आहे तर दिवाळीत देखील वसूबारसचा हा सण येत असतो. त्यामुळे वसुबारसपासूनच दिवाळीला खरी सुरुवात होते. काही भागात वसुबारसला गोवत्स द्वादशी म्हणतात. वसुबारस हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तिची प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.
वसुबारस कशी साजरी केली जाते?
वसु बारस दिवशी सकाळीच सडा, रांगोळी काढली जाते. तुळशीचे पूजन केले जाते. वसुबारसच्या दिवशी गाईची अन तिच्या वासरांची अंघोळ केली जाते त्यांना सजवले जाते. संध्याकाळी गाय वासरांची आणि गोठयातील इतर ढोरावासरांची मनोभावे पूजा केली जाते. गाईला बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेगांच्या भाजीचा नैवेद्य खाऊ घातल्या जातो.
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, असे पुराणात सांगितले आहे. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. त्या गहू, मूग खात नाहीत. वसुबारसच्या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम