दुध उत्पादनात होणार मोठी वाढ या डेअरीने घेतला पुढाकार !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २८ जानेवारी २०२३ ।  देशातील दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकरीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ‘सेक्सेल सीमेन जेनेटिक’ प्रयोगशाळा चितळे डेअरीच्या वतीनं उभारण्यात आली आहे. सांगलीच्या भिलवडी येथील प्रयोगशाळेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हैस, गाय या पशूंना कृत्रिम रेतन करण्यासाठी शंभरहून अधिक रेडे, वळू जोपासले जाणार आहेत. तसेच केवळ अधिक दूध देणार्या मादीचाच जन्म कृत्रिम रेतनाद्बारे या प्रयोगशाळेत देण्यावर भर देण्यात येणार आहे.

जागतिक पातळीवर दूध व्यवसायाचा विचार केला तर भारतात दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, जगाच्या तुलनेत दूध उत्पादनाचा वाटा केवळ 10 टक्के आहे. जनावरांपासून मिळणार्या दुधाचे प्रमाण कमी असल्यानं दूधाच्या परिमाणात वाढ होण्यासाठी ब्रह्मा प्रकल्पात संशोधन करण्यात आला आहे. सिमेन्समधील स्त्री बीज विलग करुन त्याचे मुर्हा म्हशीच्या गर्भामध्ये रोपण करण्यात आलं आहे. हे रोपण यशस्वी झाले असून हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती जीनस एबीएसचे संचालक विश्वास चितळे यांनी दिली.

paid add

उच्चतम उत्पादन क्षमता असलेले निवडक वळूंची अमेरिकेतून भारतात आयात केली आहे. ब्रह्मा या बुल सेंटरमध्ये त्यांची जोपासना करण्यात येत आहे. या प्रकल्पातून दरवर्षी 35 ते 40 लाख सिमेन डोसेसचे उत्पादन करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग पशुधनाची उत्पादकता वाढवण्यासाठी होत आहे. ब्रम्हा बुल सेंटरमध्ये उच्च प्रतीच्या गाई म्हैशींचे 30 ते 40 लाख सिमेन डोस तयार होतात. 10 लाख सेक्सेल सिमेन्स म्हणजे फक्त मादी जातीचे सिमेन डोस तंत्रज्ञानाचा वापर करुन सेपरेट केले जातात. ते भरवल्यानंतर 95 टक्के गाई म्हैशींना पाडी किंवा रेडीच होते.

सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रयोगशाळेमुळं भारतीय दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम