कृषीसेवक | ३ नोव्हेबर २०२३
देशभरातील शेतकरी शेतीसोबत दुय्यम व्यवसाय म्हणून दुधाचा देखील उद्योग करीत असतात आणि भारत दुध उत्पादनात पहिल्या स्थानी असून तरी दुधाच्या उत्पादन क्षमतेत आपण जगाच्या खूपच मागे आहोत. त्यामुळे आपल लक्ष हे दुधाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर असण गरजेचे आहे. फायदेशिर दुग्ध व्यवसायासाठी डेअरी व्यवसायाच अर्थकारण समजून घेण गरजेच आहे. त्यासाठी काय कराव लागेल?
चांगल्या प्रतीच्या गाईंचा अभाव, चुकीच्या पद्धतीने खाद्य व्यवस्थापन यामुळे दुग्धव्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात चालला आहे. दुधाला कमी दर हा विषय ऐरणीवर असला तरीही दुधाची उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ याशिवाय हा व्यवसाय शाश्वत होऊ शकणार नाही. याचाच विचार करून भविष्यात या व्यवसायात आमूलाग्र बदल करावे लागणार आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय फायदेशिर करण्यासाठी गायी फायद्याच्या की म्हशी?, एक लिटर दूधामागे किती खर्च येतो? आणि फायदेशिर व्यवसायासाठी घरच्याघरी पशुखाद्य तयार कराव का? या गोष्टींचा विचार होण गरजेच आहे.
भारतात ५५ टक्के दूध म्हशीपासून आणि ४५ टक्के दूध गायीपासून मिळत. दुग्ध व्यवसायासाठी गायी घ्यायच्या की म्हशी हे ठरत तुम्हाला दूध कुठे विकायच आहे यावर. कारण म्हशीच दूध तुम्ही थेट ग्राहकाला विकू शकता पण गायीच दूध तुम्ही थेट ग्राहकांना विकू शकत नाही. स्थानिक डेअरी द्वारे हे दूध गोळा करुन ग्राहकांपर्यंत जात.
म्हैस दूध कमी देते आणि गाय जास्त दूध देते. पण म्हशीच्या दुधात फॅट च आणि एसएनएफ च प्रमाण हे गायीच्या दुधापेक्षा जास्त असत. म्हणजे म्हशीच दूध हे घट्ट असतं. त्यामुळे म्हशीच्या दुधाला भाव जास्त मिळतो. गायी, म्हशीच्या दुधातील हा फरक लक्षात घेतला पाहिजे. संकरित गाय पाळायची असेल तर ३ ते ५ हजार लिटर दूध एका वेता मध्ये मिळत. तर देशी गायीपासून एका वेतामध्ये हजार ते दोन हजार लिटर दूध एका वेतामध्ये मिळत. हे लक्षात घ्या.
तुम्ही जर म्हैस पाळणार असाल तर ही म्हैस तुम्हाला ८ ते १० महिन्यामध्ये हजार ते दोन हजार लिटर दूध देते. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही ठरवायच की, तुम्हाला गायी पाळायच्या आहेत की म्हशी. तसच तुमच्या गावात जास्त म्हशी आहेत की जास्त गायी आहेत. या वरुन सुद्धा तुम्ही ठरवू शकता. उन्हाळ्यात म्हशींना उष्णतेचा जास्त त्रास होतो. तुमच्या भागात जर उन्हाळा जास्त तीव्र असेल तर अशावेळी तुमच्या कडे पाण्याची व्यवस्था कशी आहे? म्हशींना पाणी उपलब्ध होईल का? अशा गोष्टीचा विचार करावा.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम